सध्या ऋतु बदलतोय. उत्तरायण सुरू झाले आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे सगळ्यांची शरिरातील उष्णता खुप वाढली आहे. आणि त्यामुळेच उष्णतेचे विकार तोंड येणे, चेहर्यावर तारुण्य पिटीका येणे , नाकातुन रक्त येणे, उन्हाळी लागणे असे विकार सध्या मोठ्या प्रमाणात दिसतात, यावर रामबाण उपाय म्हणजे शरिरातील उष्णता कमी करणं त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले नक्षत्र सातु पीठ. गुळाच्या पाण्यात सातु पीठ कालवुन खाण्याने उष्णता कमी होते. तुमच्या आवडीनुसार सातुच्यापिठाचे क्रिस्पी रोल ही करु शकता.
नाचणी का खावी?? कारण नाचणी ही पचायला हलकी असते, आजारातून उठलेल्या रुग्णांसाठी योग्य असते, पोटाच्या तक्रारी दूर होतात. नाचणी पित्तशामक, थंड, रक्तदोष कमी करणारी आहे. नाचणी सत्व आणि दूध साखर टाकून केलेली खीर लहान बाळ किंवा वयस्कर व्यक्तींसाठी उत्तम आहार आहे. यामुळे भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवली जाते. नाचणीलाच काही भागात नागली, रागी किंवा फिंगर मी लेट म्हणतात. नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकारानं मोहरी सारखे बारीक असतात. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चे प्रमाण भरपूर आहे.